Road Closure | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घाटमार्गांपैकी एक असलेल्या कन्नड–तलवाडा घाट रस्त्यावर आता दीड वर्ष वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सिंहगड घाट (Singhgad ghat) मार्ग बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. या दोन्ही निर्णयांमुळे राज्यातील प्रवासी व जड वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी प्रशासनाचा दावा आहे की सुरक्षितता, दुरुस्ती व रुंदीकरणासाठी हे उपाय आवश्यक आहेत.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा २०२६ आणि सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सिंहगड घाट मार्ग २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता कन्नड–तलवाडा घाट पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा जिल्हा पोलिसांनी केली आहे. या निर्णयामुळे उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि गुजरातकडे जाणाऱ्या जड वाहनांना मोठा फटका बसणार आहे. (Kannad Talwada Ghat)
कन्नड–तलवाडा घाटावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती :
जिल्हा पोलिसांच्या माहितीनुसार कन्नड–तलवाडा घाटावर दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे २५ नोव्हेंबर २०२५ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाट रस्त्यावरील काम सुरळीत पूर्ण व्हावे आणि जड वाहतुकीचा ताण कमी व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
औट्रम घाट २०२३ पासूनच जड वाहतुकीसाठी बंद असल्याने कन्नड–तलवाडा घाटावर मोठ्या प्रमाणात ट्रक व कंटेनरचा ताण वाढला होता. त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच खराब झाली. आता या दुरुस्तीच्या कामांमुळे दररोज धावणाऱ्या जवळपास १३ हजार जड वाहनांना अतिरिक्त ६० ते ७० किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. एमएसआयडीसीला या संपूर्ण दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Road Closure | कुठून कुठे जाणाऱ्यांसाठी नवीन पर्यायी मार्ग जाहीर :
वाहतूक बंदीमुळे सर्व प्रवाशांना व जड वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, म्हणून जिल्हा पोलिसांनी पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे. प्रशासनाने संपूर्ण नियोजन करून वाहतूक वळविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. खालील मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे: (Maharashtra Highway)
१. छत्रपती संभाजीनगर–चाळीसगाव/धुळे (पूर्वी तलवाडा घाटमार्गे जाणारी वाहने) :
साजापूर → लासूर → गंगापूर चौफुली → वैजापूर → येवला → मनमाड → चाळीसगाव/धुळे
२. छत्रपती संभाजीनगर–धुळे :
साजापूर → माळीवाडा → समृद्धी महामार्ग → झांबरगाव → गंगापूर चौफुली → वैजापूर → येवला → मनमाड → धुळे
३. जड वाहतूक (चाळीसगाव/धुळे मार्गासाठी) :
साजापूर → कसाबखेडा फाटा → देवगाव रंगारी → शिऊर → वैजापूर → येवला → मनमाड → चाळीसगाव/धुळे
या पर्यायी मार्गांमुळे वाहनांची गर्दी नियंत्रित ठेवता येईल, असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रवासी व वाहनचालकांनी अनावश्यक कोंडी टाळण्यासाठी हे मार्ग वेळेवर वापरावेत, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. घाटातील खराब रस्ता, जड वाहतुकीचा ताण आणि सुरु असलेल्या दुरुस्तीमुळे हा निर्णय अनिवार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.






