वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार सुरवात

On: November 27, 2025 6:00 PM
WPL 2026 Schedule
---Advertisement---

WPL 2026 Schedule | महिलांची सर्वात महागडी आणि जगभर चर्चेत असलेली वुमन्स प्रीमियर लीग (WPL) पुन्हा एकदा रंगणार आहे. मागील तीन पर्वांच्या प्रचंड यशानंतर चौथ्या पर्वाकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदाच्या मोसमातील खेळाडू लिलाव सुरू असतानाच बीसीसीआयने अखेर WPL 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता आणखी वाढली असून केवळ 40 दिवसांवर WPL ची चाहूल लागली आहे. (WPL 2026 Schedule)

वुमन्स वनडे वर्ल्डकप विजयाच्या पार्श्वभूमीवर या लीगचं महत्त्व आणि लोकप्रियता आणखी वाढलेली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या तीन पर्वांनी चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे चौथ्या पर्वाचा पहिला बॉल कधी टाकला जाणार, कोणत्या शहरांत सामने होणार, ही उत्सुकता चांगलीच वाढली होती. अखेर बीसीसीआयने ही उत्सुकता संपवत अधिकृत घोषणा केली आहे. (Women’s Premier League)

9 जानेवारीला सुरुवात, 5 फेब्रुवारीला अंतिम सामना :

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 9 जानेवारी 2026 पासून स्पर्धेला सुरुवात होणार असून 5 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. संपूर्ण स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये होणार आहे. उद्घाटन सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील (DY Patil Stadium) स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून, भव्य अंतिम सामना वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियममध्ये रंगणार आहे.

पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षांप्रमाणेच या पर्वातही एकूण 22 सामने होतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ 8 सामने खेळणार असून, प्रत्येक संघ एकमेकांसमोर दोनदा भिडणार आहे. साखळी फेरीत पहिल्या स्थानावर येणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांना क्वालिफायर खेळून अंतिम फेरीत प्रवेश मिळवावा लागणार आहे.

WPL 2026 Schedule | मागील मोसमातील स्पर्धा आणि यंदाची अपेक्षा :

WPL 2025 मध्ये प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी मात करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 2023 आणि 2025 या दोन मोसमांत विजेतेपद मिळवत सर्वात यशस्वी संघ म्हणून नावलौकिक कमावला आहे. तर 2024 मध्ये स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा जेतेपद संपादन केले होते. (WPL 2026 Schedule)

चौथ्या पर्वात कोण बाजी मारणार, कोणता संघ सर्वांत मजबूत ठरणार आणि कोण खेळाडू चमकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लिलाव प्रक्रियेदरम्यान संघांची रणनीती पाहता यंदाच्या मोसमातही चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाही. बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करताच सोशल मीडियावर WPL बद्दलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

News Title: WPL 2026 Schedule Announced: Women’s Premier League Set to Start on January 9, Final on February 5

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now