Nag Panchami 2025 | श्रावण महिन्याच्या पवित्र काळात येणारा नागपंचमी हा सण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात भक्तीभावाने साजरा केला जातो. यंदा नागपंचमी मंगळवारी, २९ जुलै २०२५ रोजी आहे. हा सण नागदेवतेला समर्पित असतो आणि यानिमित्त घराघरांत पूजन, झोके व्रत भोजनाचे आयोजन केले जाते. (Nag Panchami 2025)
या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीला धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे.
नागपंचमीला काय करावं? :
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत होणं आवश्यक आहे. यानंतर शिवजी आणि नागदेवतेचे पूजन करावे. घराजवळील नागमंदिरात जाऊन पूजा करणं किंवा घरातच नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून पूजन करणं योग्य मानलं जातं. नागदेवतेला दूध, हार, फुले अर्पण करून आशीर्वाद मागावा. (Nag Panchami 2025)
या दिवशी उकडलेले अन्न खाण्याची परंपरा आहे. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे की पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर असते, त्यामुळे हलकं व उकडलेलं अन्न आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. अनेक ठिकाणी या दिवशी विवाहित महिला माहेरी येतात, झोके खेळतात, स्त्रियांचे पारंपरिक गाणी गायले जातात. ग्रामीण भागात अजूनही ही परंपरा उत्साहाने साजरी केली जाते.
Nag Panchami 2025 | नागपंचमीला काय करू नये? :
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत साप पकडून त्याची पूजा करणे पूर्णपणे टाळा. पूर्वी काही भागांत अशी प्रथा होती, पण आता यावर कायदेशीर बंदी आहे. सापांना दूध पाजण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, कारण साप दूध पचवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.
या दिवशी कोणालाही त्रास देऊ नये, विशेषतः प्राणिमात्रांप्रती दयाभाव बाळगावा, असा संदेश या सणात आहे. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे.






