मेरठ हत्याकांडातील मुस्कान रस्तोगीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट समोर!

On: March 25, 2025 3:08 PM
Meerut Murder Case
---Advertisement---

Muskan Rastogi | मेरठमध्ये सौरभ हत्याकांडाने (Saurabh Murder Case) खळबळ उडवलेल्या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला सध्या तुरुंगात आहेत. मात्र, तुरुंगात गेल्यानंतर दोघांनाही नशेचं तीव्र व्यसन जाणवू लागलं. नशेची तल्लफ इतकी वाढली की त्यांचं आरोग्यही बिघडू लागलं आणि त्यांना उपचारांची गरज भासू लागली. तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांना औषधं देण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या वैद्यकीय तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत.

दोघेही नशेच्या व्यसनात अडकले-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुस्कानचा प्रेग्नंसी टेस्टही करण्यात आला असून तो निगेटिव्ह आला आहे. तुरुंगात दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुस्कानने काहीही खाल्लं नव्हतं. मात्र, नंतर तिला औषधं दिल्यानंतर तिच्या तब्येतीत थोडाफार सुधार झाला आहे. मुस्कानने तुरुंग प्रशासनाकडे सरकारी वकील मिळवून देण्याची मागणी केली असून यावर प्रशासनाने तिला न्यायालयामार्फत वकील मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

तुरुंग अधीक्षक वीरेश राज शर्मा (Viresh Raj Sharma) यांनी सांगितलं की, सुरुवातीला मुस्कान आणि साहिल हे दोघंही अत्यंत घाबरलेले होते आणि त्यांनी एकत्र ठेवण्याची विनंती केली होती. मात्र नियमानुसार त्यांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं. ते पुढे म्हणाले की, “दोघेही नशेच्या व्यसनात अडकलेले आहेत. नवीन कैद्याचं आम्ही नियमित वैद्यकीय परीक्षण करतो. डॉक्टरांनी त्यांच्यात विड्रॉल सिम्प्टम्स ओळखले आहेत आणि लगेच औषधोपचार सुरू केला आहे.”

मुस्कान आणि साहिलसाठी औषधांसोबतच काउन्सलिंग-

प्रशासनाकडून मुस्कान आणि साहिलसाठी औषधांसोबतच काउन्सलिंग, योग, आणि ध्यान यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामुळे त्यांना नशेच्या व्यसनातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधीक्षकांनी आशा व्यक्त केली की, १० ते १५ दिवसांत त्यांना नशेपासून पूर्णपणे मुक्त करता येईल. मुस्कानने सांगितलं की तिचे नातेवाईक तिच्यावर रागावले आहेत आणि तिच्यासाठी वकील देणार नाहीत. यामुळे ती सरकारी वकील मागत आहे. तुरुंग प्रशासनाने तिचं अर्ज न्यायालयाकडे पाठवलं असून लवकरच तिला वकील मिळण्याची शक्यता आहे.

Title: Muskan-Sahil Struggle With Addiction In Jail

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now