मर्चंट नेव्ही ऑफिसरचा खून करून प्रियकराचा वाढदिवस साजरा, व्हिडीओ होतोय व्हायरल!

On: March 22, 2025 7:19 PM
muskan rastogi
---Advertisement---

Muskaan Rastogi | उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूत (Saurabh Rajput) यांच्या खुनानंतर त्यांच्या पत्नी मुस्कान रस्तोगी (Muskaan Rastogi) आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला (Sahil Shukla) यांनी हिमाचल प्रदेशात 15 दिवसांची सहल केली होती. या प्रवासादरम्यान त्यांच्या वागणुकीत कोणताही अपराधभाव नव्हता, अशी माहिती त्यांच्यासोबत प्रवास केलेल्या ड्रायव्हर अजबसिंग (Ajab Singh) यांनी दिली.

हॉटेलमध्ये राहून वाढदिवस-

सौरभच्या खुनाच्या दिवशीच म्हणजे 4 मार्च रोजी साहिल आणि मुस्कानने एक स्विफ्ट डिझायर कार बुक केली आणि हिमाचलच्या दिशेने निघाले. त्यांनी शिमला, मनाली आणि कसोल या ठिकाणी फिरस्ती केली. दोघेही कसोलमध्ये 10 मार्च ते 16 मार्चदरम्यान एका हॉटेलमध्ये राहिले. तेथे त्यांनी स्वतःला पती-पत्नी म्हणून ओळख दिली. मात्र, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मते हे जोडपं दिवसाचा बहुतेक वेळ खोलीतच राहायचे आणि फक्त एकदाच बाहेर पडायचे.

हॉटेलचे ऑपरेटर अमन कुमार यांनी सांगितले की, मुस्कान आणि साहिल कोणाशीही भेटले नाहीत, खोली साफ करण्याची परवानगी दिली नाही आणि फारच कमी संवाद ठेवला. त्यांनी चेक-आऊट करताना सांगितले की, ते मनालीहून आले आहेत आणि आता उत्तर प्रदेशला परत जात आहेत.

ऑडिओ मेसेजमधून उघड झालेलं रहस्य-

ड्रायव्हर अजबसिंगने सांगितले की, साहिल दररोज दोन बाटल्या दारू प्यायचा आणि मुस्कान तीन बीयरचे कॅन प्यायची. त्यांनी होळीही उत्साहात साजरी केली. एका हॉटेलमध्ये मुक्काम करताना मुस्कानने व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ मेसेजद्वारे ड्रायव्हरला साहिलसाठी केक आणण्याची विनंती केली होती. “भैया, प्लीज कुठूनतरी केक घेऊन या, कॉल करू नका, फक्त मेसेज करा आणि केक आमच्या खोलीत ठेवा,” असं तिने त्या ऑडिओमध्ये म्हटलं होतं.

या ट्रिपसाठी त्यांनी 15 दिवसांसाठी ₹54,000 मध्ये कार बुक केली होती. ड्रायव्हरला खुनाची माहिती नव्हती, परंतु प्रवासादरम्यान दोघांचं वागणं नेहमीच वेगळं वाटत होतं, असं त्याने सांगितलं.

सौरभ राजपूत खून प्रकरणाचा उलगडा

पोलिसांच्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिलने सौरभचा खून केला. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून ते एका ड्रममध्ये टाकले आणि सिमेंटने बंद केलं. तपासात हे प्रकरण उघड झाल्यानंतर 19 मार्च रोजी दोघांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर या दोघांचे होळी साजरी करतानाचे आणि वाढदिवसाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, जे आता चर्चेचा विषय ठरले आहेत.

News Title : Muskaan Rastogi celebrates her boyfriends birthday

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now