टप्पू नव्हे तर बबिताजी ‘या’ अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये?; स्वतःच केला खुलासा!

On: March 14, 2024 8:05 PM
---Advertisement---

Munmun Dutta | टेलिव्हजनमधील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. 15 वर्षापासून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये मुनमुन दत्ताने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र मुनमुन दत्ता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामधील टप्पू म्हणजेच अभिनेता राज अनाडकत याचं नाव मुनमुन दत्तासोबत जोडलं गेल्यांने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक नवा खुलासा केला होता.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) एका अभिनेत्याच्या प्रेमात वेडी असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर, रिलेशनमध्ये असताना मुनमुनने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय देखील घेतला होता. अभिनेता अरमान कोहली याच्यासोबत मुनमुन दत्ता रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणंही व्हायचं. इतकंच नव्हे तर अरमानने मुनमुनवर हात उचलला होता, अशी बातमीही समोर आली.

या सततच्या त्रासामुळे मुनमुनने तिचं आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. हे सर्व दावे अभिनेत्री डॉली बिंद्राने देखील केले होते. डाॅली म्हणाली होती, की मुनमुन आणि अरमान यांच्यात अनेकदा वाद व्हायचे आणि जेव्हा वाद वाढायचा, तेव्हा अरमान मुनमुनवर हात उचलायचा. मात्र या सर्व आरोपांवर अरमान किंवा मुनमुनने कधीच मौन सोडलं नाही.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल-

जेव्हा मुनमुन (Munmun Dutta) आणि अरमानचं नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी स्वतः मुनमुनने या बदल संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ती म्हणाली होती की, ‘अरमान कोहलीसोबत मी रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या खोट्या बातम्या पसरवणं थांबवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Kohli (@armaankohliofficial)

मी गेल्या काही वर्षांपासून या चर्चांवर काही प्रतिक्रिया देत नव्हती. कारण त्या आपोआप शांत होतील असं मला वाटलं होतं. मात्र असं झालं नाही. कोणीही उठून माझ्याबद्दल काहीही बोलतंय. अशा फेक बातम्या छापणं बंद करा, अन्यथा मला याविरोधात कोर्टाची पायरी चढावी लागेल.

News Title : munmun dutta and armaan kohli relationship

महत्त्वाच्या बातम्या-

वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना झापलं, म्हणाले…

काँग्रेस सोडणार?, प्रणिती शिंदेंचा मोठा खुलासा

“आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलो आता माझं तुम्हाला ऐकावं लागेल”

अजित पवारांना पहिला मोठा झटका; निलेश लंकेंनी अजित पवारांचं ऐकलंच नाही

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now