Maharashtra BJP | राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोरदार इनकमिंग सुरू असतानाच आता भाजपला मोठा झटका बसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांदरम्यान भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी भाजप मजबूत स्थितीत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, अचानक झालेल्या या घडामोडीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून विरोधी पक्षांना नवी ऊर्जा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. (Mira Bhayandar Politics)
मीरा-भाईंदरमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत मोठा प्रवेश :
मीरा-भाईंदरमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपचे माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे प्रमुख उपस्थित होते. तसेच महिला जिल्हाध्यक्षा ममता मॉरिस आणि युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल यांचीही उपस्थिती होती. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे.
Maharashtra BJP | युती-आघाडी आणि पक्षांतराला वेग :
महापालिका निवडणुका जाहीर होताच राज्यात युती-आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युतीची अधिकृत घोषणा केली असून, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (sharad pawar group) युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडीनेही भाजप वगळता इतर पक्षांसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. (NCP Joining BJP Leaders)
दुसरीकडे, पक्षांतराचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. ऐनवेळी होणाऱ्या या पक्षांतरांमुळे सर्वच पक्षांची रणनीती बदलत असून, पक्षांतर रोखणं हे मोठं आव्हान ठरणार आहे. येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.






