‘आजपर्यंत मी ज्या बायकांसोबत….’; Munawar Faruqui चं मोठं वक्तव्य

On: January 30, 2024 1:37 PM
---Advertisement---

Munawar Faruqui | बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले पार पडला असून या शोला विनरही मिळाला आहे. या शोचा सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सलमान खानच्या रिॲलिटी शोचा विजेता ठरला. मुनव्वरने (Munawar Faruqui) अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण श्रीकांत मशेट्टी यांचा पराभव करून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

‘लॉकअप’ त्यानंतर ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरल्यानंतर सर्वत्र मुनव्वर याची चर्चा रंगली आहे. मुनव्वर याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर, ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी मिळाली आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त मुनव्वर फारूकी याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीचं मोठं वक्तव्य 

बिग बॉस जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत मुनव्वर फारूकीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांनी मला जिंकवलं आहे, त्यांचे मी आभार मानतो… पुढचा प्रवास अधिक कठीण आहे. मला आणखी मेहनत करावी लागणार आहे. मी आजपर्यंत अनेक बायकांसोबत काम केलं आहे आणि त्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे, असं मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) म्हणाला.

मी प्रत्येक गोष्ट सांगायला सुरुवात केली तर, इकडे सकाळ होईल. मी अभिषेक कुमारबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा प्रवास फार कठीण होता. त्याच्यासाठी मला प्रचंड वाईट वाटत आहे, असं मुनव्वर फारूकीने म्हटलंय.

Munawar Faruqui | मुनव्वर झाला मालामाल, ट्रॉफीसोबत मिळाले 50 लाख

बिग बॉसचा (Bigg Boss 17 ) विजेता ठरल्यानंतर मूनव्वर मालामाल झाला आहे. त्याला बिग बॉसची ट्रॉफी तर मिळालीच आहे, यासोबतच त्याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली आहे. तसेच, मुनव्वरला 50 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये 21 स्पर्धक होते, परंतु मुनव्वर फारुकीने बाजी मारत ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

15 ऑक्टोबर पासून या शोला सुरुवात झाली होती. 107 दिवस चालणाऱ्या या शोमध्ये चाहत्यांचे बरेच मनोरंजन झाले. अंतिम फिनालेमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा और अरुण माशेट्टी सामील होते. सर्वांना वाटले होते की, अभिनेत्री अंकिता लोखंडे याची विजेती ठरेल, मात्र मूनव्वरने बाजी मारत सर्वांनाच धक्का दिला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sara Ali Khan पुन्हा पडली प्रेमात?, सर्वांसमोर केलं असं काही की….

Gold-Silver Price Today | सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

Manoj Jarange | ‘या’ दोन समाजांच्या आरक्षणासाठी जरांगे लढणार, म्हणाले ‘आरक्षण कसं देत नाही तेच बघतो’

SSC Exam Hall Ticket | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now