मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

On: June 18, 2025 10:33 AM
Mumbai Water Cut
---Advertisement---

Mumbai Water Cut | अंधेरी परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. गुरुवारी, १९ जून २०२५ रोजी, अंधेरी पश्चिममधील काही भागांमध्ये तब्बल ११ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वांद्रे वेसावे जलवाहिन्यांवरील व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)

दुरुस्तीचे काम दुपारी २ वाजल्यापासून सुरू होऊन २० जूनच्या मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण अंधेरी पश्चिम विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.

कोणकोणते भाग राहणार प्रभावित? :

या दुरुस्तीमुळे खालील भागांतील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे:

पार्ले पश्चिम: लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन सबवे, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू गावठाण क्र. 3, व्ही. एम. रोड
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ: दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30)

मोरागाव (JVPD): मोरागाव, जुहू गावठाण क्र. 1 आणि 2, विलेपार्ले (पश्चिम)
(नियमित वेळ: दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30)

गिलबर्ट हिल, अंधेरी पश्चिम: जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी
(नियमित वेळ: रात्री 10.00 ते मध्यरात्री 12.30)

Mumbai Water Cut | पालिकेचे आवाहन: पाणी जपून वापरा :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या दुरुस्तीच्या कालावधीत पाणी साठवून ठेवावे व आवश्यकतेनुसारच वापरावे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा होईल, असेही सांगण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)

News Title: Mumbai Water Cut: 11-Hour Water Supply Shutdown in Andheri on June 19 – Areas Affected, BMC Notice

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now