Crime News | मुंबई हादरली! चक्क नशेसाठी दाम्पत्यानं केलं ‘हे’ भयानक कृत्य

On: November 24, 2023 2:25 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबई (Mumbai) या शहरात कधी काय होईल सांगता येत नाही. दिवसेंदिवस या शहरात गुन्हेगारी (Crime) वाढताना दिसत आहे. दरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली.

एका दाम्पत्याने (Couple) आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला आणि मुलीला विकल्याने मुंबईमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या मागचं कारण तर अणखी भयंकर आहे. नशेसाठी दाम्पत्यांनी आपल्या पोटच्या पोरांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

मुंबई येथील वांद्रे (Vandre) परिसरात एक दाम्पत्यांनी आपल्या मुलाला (Boy) आणि मुलीला (Girl) नशेसाठी विकलं होतं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार दाम्पत्यांना ड्रग्जचं (Drugs) व्यसन होतं. याच कारणामुळे नशेसाठी पैसे (Money) पुरत नव्हते. यामुळे त्यांनी मुलगा हुसेन (Husain) याला दीड वर्षांपूर्वी आणि नवजात मुलीला जन्मताच 1 ऑक्टोबर रोजी विकलं होतं.

शब्बीर (Shabir) आणि सानिया खान (Saniya Khan) असं या दाम्पत्याचे नाव आहे. राहणाऱ्या रुबिना खान (Rubina Khan) यांच्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात (Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबिना यांचा भाऊ असलेला शब्बीर (Shabbir) हा लग्नानंतर त्याच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास आला.

शब्बीर आणि सानिया हे दोघंही नवरा बायको ड्रग्जच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडण व्हायचं. यामुळे सानिया घर सोडून वर्सोव्यात माहेरी राहण्यासाठी गेली. 2019 मध्ये त्यांना सुभान (Subhan) नावाचा एक मुलगा झाला.

सानियाच्या आईच्या निधनानंतर दोघंही नालासोपारा (Nalasopara) येथे भाड्याने राहू लागले. तिथे त्यांना 2021 मध्ये हुसेन नावाचा मुलगा झाला. तर, 1 ऑक्टोबर 2023 ला एक मुलगी झाली. या दाम्पत्याने हुसेन आणि नवजात मुलीला चक्क नशेसाठी विकल्याचं समोर आलंय.

थोडक्यात बातम्या-

Weather Update | सावधान! राज्यातील ‘या’ जिह्यांना यलो अलर्ट जारी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now