Mumbai School | आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईत मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते, रेल्वे वाहतूक आणि शाळांवर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. (Mumbai Rains)
मुंबईतील शाळा तातडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. सकाळच्या सत्रात शाळेत गेलेल्या मुलांच्या पालकांना काळजी करण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोकण व घाटमाथ्यासह मुंबईत सतर्कतेचा इशारा :
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह पुणे व सातारा घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे. (Mumbai Rains)
सध्या कुर्ला, दादर परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली असून, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत असली तरी पाऊस कायम राहिल्यास तीही विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai School | वाहतुकीवर मोठा परिणाम :
लोकल रेल्वेसोबतच रस्ते वाहतुकीवरही पावसाचा फटका बसला आहे. मंत्रालय ते फ्री वे मार्गावर वाहतूक संथ झाली असून, सखल भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. (Mumbai school holiday)
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.






