मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ वेळेत रस्ता बंद राहणार

On: September 16, 2025 10:26 AM
Shaktipeeth Expressway
---Advertisement---

Mumbai Pune Expressway Block | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आज (मंगळवार, १६ सप्टेंबर) महत्त्वाची बातमी आहे. दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान भातनजवळील कामामुळे वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) तर्फे २२ केव्ही वीजवाहिनी व फिडर टाकण्याचे काम नियोजित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Pune Expressway Block Today)

या कालावधीत कि.मी. ०९.६०० ते कि.मी. ०९.७०० या दरम्यान मुंबई आणि पुणे लेनवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक थांबवली जाणार आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६ नुसार अधिसूचना जारी केली आहे. वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पर्यायी मार्ग कोणते? :

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने – कळंबोली सर्कल (जेएनपीटी रोड डी पॉईंट, पळस्पे) येथून महामार्ग क्र. ४८ वर वळवली जातील.

मुंबईहून पुण्याकडेच – शेड्रग एक्झिट (कि.मी. ०८.२००) येथून महामार्ग क्र. ४८ वर वळवून खालापूर टोल नाका (कि.मी. ३२.२००) आणि मॅजिक पॉईंट (कि.मी. ४१.२००) येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल. (Mumbai Pune Expressway Block Today)

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने – खोपोली एक्झिट (कि.मी. ३९.१००) वरून महामार्ग क्र. ४८ वर वळवली जातील.

पुण्याहून मुंबईकडेच – खालापूर टोल नाका एक्झिट (कि.मी. ३२.६००) वरून पाली ब्रीज मार्गे महामार्ग क्र. ४८ वर वाहने वळवली जातील.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा ब्लॉक फक्त वीजवाहिनीचे काम सुरू असताना राहणार असून, काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू केली जाईल. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Mumbai Pune Expressway Block | पुणे शहरात पे अँड पार्क योजनेचा विचार :

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन उपाययोजना आखण्यात येत आहे. जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, फर्ग्युसन रोड, बालेवाडी हाय स्ट्रीट, विमाननगर आणि बिबवेवाडी या सहा रस्त्यांवर लवकरच पे अँड पार्क, नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोन अंमलात आणले जाणार आहेत. (Mumbai Pune Expressway Block Today)

या रस्त्यांवरील वाहनचालकांकडून १०, १५ आणि २० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असून, दुचाकींसाठी तासाला २, ३ आणि ४ रुपये इतके दर लागू होतील. ही अंमलबजावणी वेंडिंग कमिटीच्या चर्चेनंतर होणार आहे.

News Title: Mumbai Pune Expressway Block Today: Traffic Closed Between 2 to 3 PM, Check Alternative Routes and Pune Pay & Park Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now