दादासाहेब फाळके पुरस्काराच्या नावाखाली चक्क सरकारची फसवणूक, पोलिसांकडून 3 आरोपींना अटक

On: February 7, 2025 7:19 PM
Mumbai News
---Advertisement---

Mumbai News: मुंबई पोलिसांनी ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड’च्या आयोजकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. अनिल मिश्रा (Anil Mishra), त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा (Abhishek Mishra) आणि इतर काही जणांनी हा अवॉर्ड सोहळा अधिकृत असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फसवणुकीचे जाळे – सरकारच्या अधिकृत पुरस्काराचा गैरवापर

मुंबईच्या (Mumbai News) बांद्रा (Bandra) भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १९ आणि २० फेब्रुवारीला होणाऱ्या ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड’ या कार्यक्रमाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award) चा अधिकृत भाग असल्याचे दर्शवण्यात आल्याची माहिती आहे.

बीजेपी चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित (Sameer Dixit) आणि सचिव निकिता घाग (Nikita Ghag) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, हा कार्यक्रम ‘इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिव्हल प्रायव्हेट लिमिटेड’ (International Tourism Festival Pvt. Ltd.) कंपनीतर्फे आयोजित करण्यात आला होता.

संपन्न व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी बनावट प्रसिद्धी-

समीर दीक्षित यांनी सांगितले की, अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी या कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी शुभेच्छा दिल्याचा बनावट दावा केला.

या कार्यक्रमात (Mumbai News) बॉलिवूड कलाकार सहभागी होणार असल्याचं सांगून लोकांकडून प्रती जोडपे २.५ लाख रुपये दराने तिकीट विक्री केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे कारण १२ मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्व (Sponsorship) मिळवण्यासाठी अनिल मिश्रा यांनी हा कार्यक्रम केंद्र सरकारशी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विभागांकडून आर्थिक सहाय्य मिळवले.

वांद्रे पोलिसांनी (Mumbai News) अनिल मिश्रा आणि इतर आरोपींवर BNS कलम ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांची चौकशी केली जात आहे.

English Title: Mumbai News Police Arrest 3 for Dadasaheb Phalke Award Scam

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now