मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

On: April 6, 2024 3:27 PM
Mumbai Mega Block Alert
---Advertisement---

Mumbai News | मुंबईतील जनतेसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाइनच आहे. लोकलमुळे मुबईकरांचा प्रवास खूप सोयीस्कर होतो. कमी खर्चात त्यांना प्रवास करता येतो. त्यामुळे यात काहीही अडचण आली की, लोकल प्रवास करणाऱ्यांचे हाल होतात. आता लोकल संबंधीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

रविवारी घराबाहेर पडणार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण उद्या (7 एप्रिल) काही ठिकाणी मेगा ब्लॉग असणार आहे. दुपारी 3:55 पर्यंत हा मेगा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे एकदा ही बातमी नक्की वाचा.

रविवारी मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी /नेरूळ दरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

‘या’ तीन मार्गांवर ब्लॉक असणार

मध्य रेल्वे : मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवणार येणार आहेत.यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही विलंबाने धावणार आहेत. लोकल मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकात थांबतील.

हार्बर रेल्वे : ट्रान्स हार्बर मार्गावर (Mumbai News) ठाणे ते वाशी-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉग असेल. वाशी-नेरुळ-पनवेल ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वे : हार्बर मार्गावर माहीम ते अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. सीएसएमटी- वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी-गोरेगाव अप आणि डाऊन सर्व लोकल रद्द असतील.काही चर्चगेट (Mumbai News) ते गोरेगाव फेऱ्या ही रद्द राहणार आहेत.

News Title- Mumbai News Local Megablocks Update

महत्वाच्या बातम्या-

ऋतुराजच्या चेन्नई एक्सप्रेसला हैदराबादने लावला ब्रेक; SRH चा शानदार विजय

IDFC फर्स्ट बँकेला आरबीआयने ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होईल?

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

Join WhatsApp Group

Join Now