Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

On: November 7, 2023 7:33 PM
---Advertisement---

मुंबई | तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर भरती केली जाणार आहे. तुम्हाला 96 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

मुंबई महापालिकेअंतर्गत बालरोग तज्ज्ञ, मानद बाल हृदयरोगतज्ज्ञ, मानद बाल शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, बीएमटी फिजिशियन, ऑडिओलॉजिस्ट, सहायक वैद्यकीय अधिकारी, मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक याचे प्रत्येकी 1 पद भरलं जाईल

असा करा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 62 वर्षापर्यंत असावं. Djdp उमेदवारांकडून 640 अधिक जीएसटी इतके शुल्क आकारलं जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार ते 96 हजार 600 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार असल्याची माहिती आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई – 400066 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 8 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मुख्य परिचारिका, परिचारिका समन्वयक पदासाठीमनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक तसेच संबंधित कामाचा 5 वर्षांचा अनुभव असावा.

मानद बाल शल्यचिकित्सक पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय पूर्ण केलेले असावे. भूलतज्ज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमडी, डीएनबी (एनेस्थिओलॉजी) पूर्ण केलेले असावं.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now