सस्पेन्स संपला! मुंबईला मिळणार नवा ‘महापौर’! ‘या’ तारखेला होणार फैसला

On: February 4, 2026 11:18 AM
Mumbai Water Bill News
---Advertisement---

Mumbai Mayor Election | देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) अनेक वर्षांनंतर पुन्हा महापौर निवडला जाणार आहे. प्रशासकीय कारभारानंतर आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान होणार असून, या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम :

मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) महापौर निवडीसाठी प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहेत. यानंतर ११ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा आयोजित केली जाणार आहे. (Mumbai Mayor Election News)

या सभेत सकाळपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल आणि दुपारी १२ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण करून मुंबईच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जातील. यासाठी ऐतिहासिक महापौर दालनाची रंगरंगोटी, स्वच्छता आणि फर्निचरची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण पालिका भवन सज्ज झाले आहे.

Mumbai Mayor Election | राजकीय समीकरणे आणि संभाव्य उमेदवार :

अलीकडील निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे तब्बल २९ वर्षांनंतर भाजपचा महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक निकालानुसार भाजपला ८९ जागा मिळाल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना २९ जागा, तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना ६५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मिळून २५ जागांवर विजय मिळवला आहे. (Mumbai Mayor Election)

सध्या भाजप आणि शिंदे गट मिळून महायुतीकडे एकूण ११८ नगरसेवक आहेत, तर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ११४ ही जादुई संख्या आवश्यक असते. त्यामुळे महायुतीचा महापौर जवळपास निश्चित मानला जात आहे. यंदाचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमधील शितल गंभीर देसाई, रितू तावडे, तेजस्वी घोसाळकर (Bharatiya Janata Party), तसेच हर्षिता नार्वेकर आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गट उपमहापौरपदासाठी दावा करत किंगमेकरची भूमिका बजावत असल्याचे चित्र आहे.

News Title: Mumbai Mayor Election Date Fixed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now