Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!

On: December 16, 2023 10:44 AM
Rohit Sharma
---Advertisement---

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून Mumbai Indians ची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या महिन्यातच हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्ससोबत ट्रेड केलं होतं.

Mumbai Indians वर चाहते भडकले

आयपीएल लिलावापूर्वी या ट्रेडची बरीच चर्चा झाली होती. हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरातचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ दोनदा अंतिम फेरी गाठण्यात आणि एकदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. मात्र आता थेट रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन केल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स चांगलेच भडकले आहे.

Mumbai Indians आणि हिट मॅन रोहित शर्मा सर्व चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आबे. मुबंई इंडियन्सला रोहित शर्माशिवाय चाहते बघू शकत नाही. कारण रोहितमुळेच बरेच जण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून समोर आली आहे. रोहितने 11 हंगामात संघाचं नेतृत्व केलं. त्यापैकी मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावलंय. आता मात्र रोहितला कर्णधारपदावरून काढल्याने चाहते प्रचंड भडकले आहेत.

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यापासून चाहते सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करत आहेत. मुंबई इंडियन्सचे इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत, तर फ्रँचायझीला ट्विटरवर चार लाखांहून अधिक लोकांनी अनफॉलो केलं आहे. याशिवाय सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स ट्रेंड करत आहेत.

लाखो चाहत्यांनी Mumbai Indians ची साथ सोडली

चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला झटका देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरु झाला. निर्णयानंतर तासाभरात लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे.

एका युजरने लिहिलं आहे आजपासून मी मुंबई इंडियन्सचा पाठिराखा नाही. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. रोहित शर्मा याचे कर्णधारपद अपमानास्पद पद्धतीने काढण्यात आल्याचं काही जणांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका!

Rohit Sharmaसाठी अत्यंत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सनंतर आता ‘हे’ मोठं कर्णधारपदही जाणार?

मुंबई इंडियन्सने Rohit Sharmaला कर्णधारपदावरुन का काढलं?, समोर आलं मोठं कारण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now