Mumbai Indians | सध्या आयपीएल सुरू आहे. आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आलं आहे. तर हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची धुरा दिली आहे. यामुळे रोहित शर्माचे चाहते आणि संघाचे चाहते असे दोन गट पडले आहेत.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधारपदाची धुरा संभाळत आहे. मात्र पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघाचा तब्बल तीन वेळा पराभव झाला आहे. यामुळे आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या चाहत्यांचा रोष आणखी वाढला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्यानं म्हणावी अशी कामगिरी केली नाही. यावर आता माजी खेळाडू मनोज तिवारी यांनी पुन्हा एकदा रोहित शर्माला संघाचा कर्णधार करा असं म्हटलंय.
काय म्हणाला मनोज तिवारी?
“रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळायला द्यावी. मुंबईचे सर्वेसर्वांना कोणताही निर्णय घेताना कसलीही अडचण येणार नाही हे पाहायला मिळालं आहे. रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधारपदाची धुरा संभाळायला दिली आहे. त्यामुळे आता संघाचा आलेख हा खाली पडू लागला आहे. रोहितनं आपल्या नेतृत्वामध्ये पाच ट्रॉफ्या जिंकून दिल्या आहेत”. (Mumbai Indians)
“मुंबईला यंदाच्या हंगामामध्ये पॉईंट्स मिळवता आले नाहीत. कॅप्टन्सी चांगली आहे असं देखील नाही”, असं मनोज तिवारी बोलला आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून मुंबई इंडियन्स संघाला केवळ 125 धावा करता आल्या.
पॉईंट्स टेबल घसरला
मुंबई 14 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा तिन्ही सामन्यातील पराभवानंतर नेट रनरेट हा आणखी घसरला आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
News Title – Mumbai Indians Captaincy On Retired Player Manoj Tiwary Statement
महत्त्वाच्या बातम्या
भाजपला मोठा धक्का?; ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार?
गरम होतंय म्हणून उर्फीने सगळ्यांसमोर केलं ‘हे’ कृत्य; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
सिंहाकडून शिका ‘या’ गोष्टी, येईल भरपूर संपत्ती






