Mumbai Crime l मुंबई पोलीस दलात 8 महिला पोलिसांसोबत सेक्स स्कँडलच्या आरोपांनी खळबळ, पत्र पाठवणाराचा शोध सुरु

On: January 8, 2024 1:40 PM
Mira road
---Advertisement---

Mumbai Crime l सध्या मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Crime) मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांनी पोलिस उपायुक्त, दोन निरीक्षक, तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचं पत्र शनिवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सारवासारव केली जात असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Crime l नेमकं व्हायरल पत्रात काय आहे? 

व्हायरल झालेल्या पत्रात असं दिसून आलं की, मोटर परिवहन विभागातील (Mumbai Crime) आठ महिला कर्मचाऱ्यांची नावे आणि सह्या या पत्रावर आहेत. मात्र चालक म्हणून कार्यरत असलेल्या या महिला पोलिसांनी असं सांगितलं आहे की, पोलीस उपायुक्त आणि मोटार वाहन विभागाचे दोन पोलीस निरीक्षक आमच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचार करत आहेत.

याबाबत खुलासा करताना एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामध्ये ‘दोन पोलिस निरीक्षक आम्हाला सरकारी वाहनातून घरी घेऊन गेले आणि उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी आमच्यावर तेथे बलात्कार केला आहे.

मुंबई पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त यांना सादर करण्यात आलं होतं. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

‘बलात्कारा’च्या लेटरबॉम्बने पोलिस दलास हादरा 

महिला पोलिसांनी (Mumbai Crime) दिलेल्या पत्रात असे लिहले आहे की, आम्ही लहान गावातून आल्यामुळे त्यांनी आमचा फायदा घेतला आहे. आम्हाला ड्युटीवर कोणतंही काम न देण्याच्या बहाण्याने, दोन पोलिस निरीक्षकांनी आम्हाला डीसीपीच्या घरी नेलं आणि त्यांनी आमच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले. याशिवाय डीसीपी कार्यालयात महिला कॉन्स्टेबल चालकांवरही बलात्कार करण्यात आला.

या पत्रात पुढे म्हटलं आहे – दोन्ही निरीक्षकांनी कृत्याचा व्हिडीओ शूट केला आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल केलं. तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने मुंबई पोलिस विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

सह पोलिस आयुक्त, एस जयकुमार (प्रशासन), म्हणाले, “सुरुवातीला आम्ही बलात्काराच्या आरोपांची चौकशी करत होतो. परंतु आठ महिला कॉन्स्टेबल चालकांना तपशीलासाठी विचारलं असता त्यांनी असं कोणतंही पत्र लिहलं नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे ते पत्र कोणी पाठवले आहे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

चौकशी संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्राथमिक चौकशीत असं दिसून आलं आहे की हे पत्र माटुंगा येथून स्पीड पोस्टद्वारे पाठवले गेलं होतं. या सर्व बाबींचा विचार करता हे पत्र खरं आहे की बनावट आहे लवकरच स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या :

Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम

Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू

Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…

Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’ 

Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now