MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

On: January 7, 2024 9:10 AM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni ! भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून दूर असतो. पण, सर्वांचा लाडका धोनी प्रसिद्धीपासून दूर राहत नाही. त्याची पत्नी साक्षी चाहत्यांना त्यांच्या लाडक्या माहिची झलक दाखवत असते. साक्षी धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अशातच धोनीचा आता एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कॅप्टन कूल चक्क हुक्का ओढताना दिसत आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळताना दिसतो. धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या चमकदार खेळीसाठी आणि मैदानाबाहेर साधे जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. धोनीने त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत होता, ज्याला पाहून सर्वांनी माहीचे कौतुक केले.

MS Dhoni चा व्हिडीओ व्हायरल

पण, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार चक्क हुक्का ओढताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, माजी भारतीय कर्णधार त्याच्या लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. धोनी यावेळी हुक्का ओढताना दिसला. धोनीने आधी हुक्का तोंडात घातला आणि धूर आत घेतला आणि नंतर तो धूर बाहेर काढून चाहत्यांनाही बुचकळ्यात टाकले.


खरं तर शांत संयमी आणि साधेपणासाठी धोनीची जगभर ख्याती आहे. मात्र, इथे धोनीचे वेगळे रूप पाहून चाहत्यांना देखील विश्वास बसेना. धोनीच्या या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही चाहत्यांनी धोनीचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे म्हणत त्याची पाठराखण केली तर, अनेकांनी माजी भारतीय कर्णधाराला ट्रोल केले.

धोनीच्या नेतृत्वात विजयरथ

चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला. गतवर्षी गुजरात टायटन्सला नमवून चेन्नईने किताब जिंकला. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK संघ 2023 मध्ये पाचव्यांदा IPL चा चॅम्पियन बनला. धोनीने संपूर्ण हंगामात संघासाठी काही शानदार फिनिशिंग इनिंग खेळल्या होत्या, ज्याने चाहत्यांचे खूप मनोरंजन झाले.

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी क्रिकेट विश्वाला धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 250 आयपीएल सामने खेळले आहेत. 218 डावात फलंदाजी करताना त्याने 135.92 च्या स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत.

Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग

Kisan Vikas Patra Yojna l फायद्याची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास होणार दुप्पट

Ram Mandir | वडिलांची इच्छा अन् 8000 किमी चालत वृद्धाची अयोध्येकडे कूच

PAK vs AUS | पाकिस्तानचा दारूण पराभव पण भारताचे मोठे नुकसान, ऑस्ट्रेलिया सुसाट

Join WhatsApp Group

Join Now