MS Dhoni | चेन्नई सुपर किंग्जने मागील हंगामातील उपविजेत्या गुजरात टायटन्सवर मंगळवारी मात केली. (CSK vs GT) सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा (IPL 2024) थरार रंगला आहे. चेन्नईने आपल्या सलामीच्या सामन्यात आरसीबीला नमवले होते, आता गुजरातला पराभवाची धूळ चारून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील संघाने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. चेन्नईचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चेन्नईने शुभमन गिलच्या संघाचा 63 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. (IPL 2024 News)
या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक अप्रतिम झेल घेतला, ज्यावरून त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनाने देखील माहीचे तोंडभरून कौतुक केले आहे. चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावर अर्थात चेपॉक स्टेडियमवर आणखी एक विजय साकारला.
“टायगर अभी जिंदा है”
धोनीने गुजरातच्या डावाच्या आठव्या षटकात कमाल केली. त्याने लय भारी झेल घेऊन विजय शंकरला बाहेरचा रस्ता दाखवला. डेरिल मिचेलच्या षटकात विजय शंकर फलंदाजी करत चेंडू बॅटला स्पर्श करून धोनीच्या दिशेने गेला. आपल्यापासून लांब असलेला चेंडू टिपण्यात माहीला यश आले अन् गुजरातला मोठा झटका बसला.
View this post on Instagram
धोनीच्या या व्हिडीओचा दाखला देत रैनाने चेन्नईच्या माजी कर्णधाराचे कौतुक केले. तो म्हणाला की, सर्वांनी लक्षात ठेवा, टायगर अभी जिंदा है… प्रत्येकाला तो प्रेरणा देत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
???????????????????????????? ???????????? ????
An excellent diving grab behind the stumps and the home crowd erupts in joy????
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/n5AlXAw9Zg
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
MS Dhoni चा अप्रतिम झेल
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 206 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक (51) धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाड (46), रचिन रवींद्र (46), आणि डेरिल मिचेलने नाबाद (24) धावा कुटल्या.
चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला पूर्ण अपयश आले. गुजरातचा संघ निर्धारित 20 षटकांत 8 बाद केवळ 143 धावा करू शकला. चेन्नईने 63 धावांनी विजय मिळवून गुजरातला पराभवाची धूळ चारली.
News Title- IPL 2024 GT vs CSK MS Dhoni took an unprecedented catch, watch here video
महत्त्वाच्या बातम्या –
आज MI Vs SRH येणार आमने- सामने; विजयाचं खातं कोण उघडणार?
सलग दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्स ठरला नंबर-1
रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!
“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!
…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?






