MPSC ची २८ सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख केली जाहीर

On: September 26, 2025 5:35 PM
MPSC
---Advertisement---

MPSC Exam | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Prelims 2025) पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. (MPSC Exam new date)

पूरस्थितीमुळे घेतला निर्णय :

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी रस्ते आणि संपर्क तुटलेला आहे. अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेला मुकू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) हा निर्णय घेतला आहे. शासनानेही यासंदर्भात औपचारिक विनंती केली होती.

MPSC कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, २८ सप्टेंबरऐवजी आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येईल. आयोगाने स्पष्ट केले की, यासंदर्भातील सुधारित शुद्धिपत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC Exam | गट-ब परीक्षेची तारीखही बदलणार :

पूर्वनियोजित गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ हीदेखील त्याच दिवशी असणार होती. त्यामुळे त्या परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, असे आयोगाने कळवले आहे. (MPSC exam postponed)

या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण ३८५ पदांसाठी भरती होणार आहे. जवळपास ३ लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने उमेदवारांना तयारीसाठी आणखी दीड महिना मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

News title : MPSC Prelims 2025 Postponed: New Exam Date Announced as 9 November | Students Get Extra Preparation Time

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now