खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात, जर्मनीत केलं लग्न

On: June 5, 2025 3:50 PM
Mahua Moitra
---Advertisement---

Mahua Moitra Wedding | तृणमूल काँग्रेसच्या प्रसिद्ध खासदार महुआ मोईत्रा यांनी दुसऱ्यांदा लग्न केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. संसदेत त्यांच्या भाषणांची आणि भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून केलेल्या टीकेची सर्वत्र चर्चा असते. फाड-फाड इंग्रजी बोलणाऱ्या याच महुआ मोईत्रा यांनी ओडिशा राज्यातील एका बड्या नेत्याशी, म्हणजेच बिजू जनता दलाचे (BJD) नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी जर्मनीत विवाह केला आहे. ही बातमी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. (Mahua Moitra Wedding News)

खासदार महुआ मोईत्रा यांनी दुसऱ्यांदा केल लग्न :

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वेळा खासदार राहिलेल्या महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांचे ३० मे रोजी जर्मनीत विवाह सोहळा पार पडला. पिनाकी मिश्रा हे राजकारणात चांगलेच सक्रिय असून, त्यांचे ओडिशा राज्यात मोठे नाव आहे. या दोघांच्या विवाहामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

पिनाकी मिश्रा हे ओडिशा राज्यातील पुरी येथून खासदार राहिलेले आहेत. त्यांनी २०२४ सालची लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना भाजपचे संबित पात्रा यांनी पराभूत केले होते. महुआ मोईत्रा यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रोरसन यांच्याशी लग्न केले होते. पुढे या दोघांनी रितसर घटस्फोट घेतला होता. महुआ मोईत्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदारसंघाच्या खासदार आहेत. (Mahua Moitra Wedding News)

२००९ साली त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. :

महुआ मोईत्रा यांनी २०१६ ते २०१९ या काळात करीमपूर या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महुआ मोईत्रा यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी झाला असून, त्या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलेले आहे. (Mahua Moitra Wedding News)

१९९८ साली त्यांनी मॅसॅच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेज, साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणितात पदवी मिळवली होती. त्यानंतर, २००९ साली त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

News Title: MP Mahua Moitra Marries for Second Time in Germany, Weds Odisha’s BJD Leader Pinaki Misra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now