मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

On: December 15, 2022 4:32 PM
---Advertisement---

मुंबई | ‘आभाळमाया’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

पराग यांनी मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

पराग यांनी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. अनेक नाट्य स्पर्धा, कार्यशाळा या माध्यमातून ते युवा रंगकर्मींशी जोडलेले होते.

पराग यांनी ‘यदा कदाचित’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘लाली लीला’, ‘पोपटपंची’, ‘सारे प्रवासी घडीचे’ या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला.

नाटकांसह त्यांनी ‘आभाळमाया’, ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावावी जिवा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केले.

अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली. ठाणे शहराला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक मिळवून देण्यात पराग बेडेकर यांचा मोलाचा वाटा होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now