Monalisa | प्रयागराजमध्ये तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळावा भरला आहे. यासाठी देश-विदेशातून साधू-संतांनी हजेरी लावली आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. तसेच, महाकुंभला गेलेल्यांच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. कधी कोणती साध्वी व्हायरल होत आहे, तर कधी कुणी उच्चशिक्षित पण संन्यास घेतलेला संन्यासी व्हायरल होत आहे. याच महाकुंभ मेळाव्यातून एक रुद्राक्ष विकणारी मुलगी व्हायरल झाली, ती तिच्या डोळ्यांमुळे. तिच्या सुंदर डोळ्यांनी अनेकांना वेड लावले आहे.
डोळ्यांमुळे चर्चेत आलेली ‘मोनालिसा’ –
अलीकडेच, महाकुंभ मेळाव्यातून हार आणि रुद्राक्ष विकणारी एक मुलगी चर्चेत आली होती. या मुलीचे नाव मोनालिसा (Monalisa). आता, या मोनालिसामध्ये असे काय खास आहे की, ती इतकी चर्चेचा विषय बनली आहे? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. खरंतर, मोनालिसा तिच्या डोळ्यांमुळे महाकुंभ मेळाव्यात विशेष चर्चेत राहिली. काही लोकांना वाटते की, मोनालिसाचे डोळे ऐश्वर्या रायसारखे (Aishwarya Rai) दिसतात, तर काहींना वाटते की, ते वामिका गब्बीसारखे दिसतात. तसे, मोनालिसाला ऐश्वर्यासारखे व्हायचे आहे.
सलमानसोबत लग्न करण्याची इच्छा
मोनालिसा (Monalisa) इतकी चर्चेत आहे की, तिला सारखे कुणी ना कुणी भेटते आणि तिचा इंटरव्यू घेते. मोनालिसा म्हणते की, तिला अभिनेत्री व्हायचे आहे. जर तिला संधी मिळाली तर ती अभिनेत्री होईल. अलीकडेच, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक युट्यूबर तिला विचारतो की, तुम्हाला अलीकडेच एका फिल्मस्टारकडून लग्नाची ऑफर आली आहे का? तर यावर मोनालिसा म्हणते, “हो सलमान खान.”
मोनालिसाचे उत्तर ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय-काय करू शकतात. मोनालिसा सलमान खानसोबत काम करू इच्छिते. युट्यूबर विचारतो की तिला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल का? मोनालिसा याला हो म्हणते.
व्हायरल व्हिडीओ-
View this post on Instagram
मोनालिसा इतकी चर्चेत आहे की, तिला सारखं कुणी ना कुणी भेटतंय आणि तिचा इंटरव्यू घेतंय. मोनालिसा म्हणते की, तिला अभिनेत्री व्हायचंय. जर तिला संधी मिळाली तर, ती अभिनेत्री होईल. अलिकडेच, आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक युट्यूबर तिला विचारतोय की, तुम्हाला अलिकडेच एका फिल्मस्टारकडून लग्नाची ऑफर आली आहे का? तर यावर मोनालिसा म्हणते, हो सलमान खान.
एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, अरे भाऊ, सलमान खान तुझ्याशी लग्न का करेल? तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही बोलू लागले आहेत. मोनालिसाचं उत्तर ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं आहे की, लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय-काय करू शकतात.






