मोहम्मद शामीचं मनात घर करणारं वक्तव्य, म्हणाला…

On: October 23, 2023 1:48 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | न्यूझीलंडविरोधात मोहम्मद शामीने (Mohammad shami) भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या. शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले आहे. मोहम्मद शामी याला आतापर्यंत संघात स्थान मिळालं नव्हतं पण हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं.

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) मिळालेल्या संधीचे सोने करताना पाच बळी पटकावले. यावर शामीने प्रतिक्रिया दिली आहे. शमीने मोठं वक्तव्य केलं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेतला तर तुम्हाला देखील चांगले रिझल्ट्स मिळतात, असं तो म्हणाला.

मी बाकावर बसलेलो असताना सर्वकाही पाहत होतो. भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता. पण, मला संधी मिळत नव्हती म्हणून मला कधीच वाईट वाटले नाही. प्रत्येकाने एकमेकांच्या यशाचा पुरेपुर आनंद घ्यायला हवा, असं तो म्हणाला. शमीच्या वक्तव्याने सर्व भारतीयांची मनं त्याने जिंकली.

दरम्यान, शामीने विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला विश्वचषकात दोन वेळा पाच विकेट घेता आल्या नाहीत. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now