भावूक होत राखीनं दिली मोदींना हाक, म्हणाली…

On: February 17, 2023 4:35 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानर(Adil Khan) गंभीर आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आदिलची चौकशी होत आदिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सध्या आदिल कोठडीत असला तरी इकडं राखी मीडियासमोर आदिलबाबत नवनवीन खुलासे करत आहे. त्यामुळं राखी आणि आदिल लवकरच घटस्फोट घेतील, अशा चर्चा होत्या. परंतु आता राखीनं आदिलसोबत घटस्फोट घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

नुकतंच राखीनं सांगितलं आहे की, तिनं आदिसोबत इस्लामिक पद्धतीन आणि कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळं आता आदिलची इच्छा असूनही त्याला घटस्फोट घेता येणार नाही.

राखीनं तिहेरी तलाक कायदा लागू केल्याबद्दल मीडिसमोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे आभारही मानले. तसेच हा कायदा तिच्यासाठी उपयाोगी ठरेल, असंही राखीनं सांगितलं आहे.

राखी मीडियाशी बोलताना म्हणाली की, आदिलला वाटत असेल की तो मुस्लिम आहे आणि तो कितीही लग्न करेन. पण तसं नाही होणार. मी संपूर्ण मुसलमान महिलांच्या वतीनेमोदींचे आभार मानते की त्यांनी तिहेरी तलाक कायदा लागू केला. पुढं ती भावूक होत असंही म्हणाली की, मला वाटलं नव्हत कधी हा कायदा कधी माझ्या उपयोगी येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now