“कोट कोट ह्रदयांचा केवळ एक ह्रदयसम्राट”

On: January 23, 2023 11:14 AM
---Advertisement---

मुंबई | आज 23 जानेवारी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. त्यांच निमित्ताने शिंदे गटापासून ते ठाकरे गटांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सहभागी होते. मनसेच्या अधिकृत ट्विटर अंकाउटवरून एक ट्विट करण्यात आलं आहे.

‘ह्या मनगटास तूच शिकवली जगण्यातील वहिवाट,कोट कोट ह्रदयांचा केवळ एक ह्रदसम्राट!’ असं ट्विट मनसे कडून करण्यात आलं आहे. त्यासोबत एक व्हिडिओदेखील ट्विट करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

जेव्हा बाळासाहेबांना कळालं की हा काही आता पक्षात राहत नाही. तेव्हा ती आमची शेवटची भेट होती. ही गोष्ट मी कधी कोणाला बोललो नाही. मी निघताना त्यांनी मला आत बोलावलं, मिठ्ठी मारली आणि आता जा असं म्हणाले. हा किस्सा राज ठाकरेंनी त्या व्हिडीओत सांगितला आहे.

त्यानंतर मध्यंतरी प्रचंड गाजलेल्या मुलाखतीबद्दल (interviews) बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं. ”मुलाखतकारानं विचारलं की नारायण राणेंचं बंड, भुजबळांचं बंड आणि राज ठाकरेंच बंड तेव्हा म्हणलं माझ बंड यात लावू नका. मी बंड केलं नाही मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. आणि तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. कोणत्या सत्तेत गेलो नाही.”

असा व्हिडीओ आणि ट्विट शेअर करत मनसेनं बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now