मनसेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

On: February 27, 2023 11:13 AM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मागील दोनदिवसांपुर्वीच राज ठाकरे यांच्या गटातील पुणे येथील पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच आता मनसेला (MNS) अणखी मोठा धक्का बसला आहे.

मनसे मधील आणखी एका बड्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे. मनसे ध्ये मसल मॅन म्हणून ओळखले जाणारे मनीष धुरी (Manish Dhuri) यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून राजकारणात या बद्दल एकच खळबळ उडाली.

राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासून मनीष धुरी हे एकदम कट्टर समर्थक मानले जात होते. राज ठाकरे यांच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा सहभाग होता. मात्र, मनीष यांनी अचानक आणि ऐवढा तडकाफडकी निर्णय का घेतला या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मनीष यांनी राजीनामा देत असताना राज ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. या वेळी माझ्या वैयक्तिक कारणामुळे सी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं मनीष धुरी यांनी या पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

वजन कमी करण्यासाठी नाष्ट्यामध्ये खा ‘हा पदार्थ आहार

हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खा शेंगदाणे!

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर?, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

“या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही काय करणार”

कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now