2100 रुपये कधी मिळणार?; महत्त्वाची अपडेट समोर

On: February 14, 2025 5:44 PM
MMLB Scheme When Will Women Gets 2100
---Advertisement---

MMLB Scheme | महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत (MMLB Scheme) सध्या दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) महायुती सरकारने (Mahayuti Government) ही रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक होऊन दोन महिने उलटले तरी, वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांकडून 2100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

महायुतीतील (Mahayuti) अनेक नेत्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील, असे संकेत दिले होते. परंतु, अद्याप कोणताही ठोस आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाढीव हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अशातच, राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 3 मार्चच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे.

योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री

दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूर्णविराम दिला आहे. “लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिलांच्या अर्थसंकल्पाकडे आशा

‘लाडकी बहीण’ योजनेत (Ladki Bahin Yojana) 2100 रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता महिलांच्या आशा अर्थसंकल्पातील घोषणांवर अवलंबून आहेत. या अर्थसंकल्पात योजनेची रक्कम वाढवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष 3 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

Title : MMLB Scheme When Will Women Gets 2100 

 

Join WhatsApp Group

Join Now