अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

On: February 12, 2024 11:02 AM
Mithun Chakraborty health update
---Advertisement---

Mithun Chakraborty | प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली होती. कोलकाता येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Mithun Chakraborty हेल्थ अपडेट

काही रिपोर्टनुसार मिथुनदा यांच्या हेल्थबद्दल अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना आता केवळ सॉफ्ट डाएट देण्यात येत आहे. शनिवारी त्यांच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांचा MRI सुद्धा काढण्यात आला.

याच्या रिपोर्टमधून असं निदर्शनास आलं आहे की, त्यांना सेरेब्रल वॅस्क्युलरएक्सीडेंट म्हणजेच ब्रेन स्ट्रोक झाला आहे. आता सध्या त्यांची प्रकृती ठीक असून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांच्या पुन्हा तपासण्या केल्या जाणार आहेत. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, याची माहिती समोर आली नाही.

Mithun Chakraborty यांचा व्हिडीओ व्हायरल

मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यात मिथुनदा बेडवर दिसत आहेत. मिथुनदा यांची अवस्था पाहून चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ चित्रपटातून पदार्पण करत मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या भूमिकेने आपला चाहता वर्ग निर्माण केला. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

“मला खूप जास्त आनंद होत आहे. सध्या मला काय वाटतंय मी शब्दांत सांगू शकत नाही. खूप त्रासानंतर जेव्हा एवढा मोठा सन्मान मिळतो तेव्हा मिळणारा आनंद काहीसा वेगळाच असतो. माझ्या कर्तृत्वाला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे.”, असे मिथुन चक्रवर्ती यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले होते.

News title – Mithun Chakraborty health update

महत्त्वाच्या बातम्या-

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

Join WhatsApp Group

Join Now