Worlds Worst Dishes | जगभरातील खाद्यपदार्थांची (Food Items) क्रमवारी (Ranking) लावणाऱ्या “टेस्टअटलास”ने (TasteAtlas) नुकतीच जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची (Worlds Worst Dishes) यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील लोकप्रिय ‘मिस्सी रोटी’चा (Missi Roti) समावेश करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर (Social Media) आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘मिस्सी रोटी’ला ५६ वे स्थान
भारतातील विविध राज्यांतील भाषा आणि खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यात खास पदार्थांची एक वेगळी ओळख असते. असे असताना, “टेस्टअटलास”ने जाहीर केलेल्या १०० सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत ‘मिस्सी रोटी’ला ५६ वे स्थान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या यादीत भारतातील फक्त ‘मिस्सी रोटी’ या एकमेव पदार्थाचा समावेश आहे. पंजाबची (Punjab) पारंपारिक (Traditional) मिस्सी रोटी ही बेसन (Gram Flour), मसाले (Spices) आणि भाज्यांपासून (Vegetables) तयार केली जाते. उत्तर भारतीय (North Indian) घरांमध्ये मिस्सी रोटी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. पौष्टिकतेच्या (Nutrition) दृष्टीनेही मिस्सी रोटी महत्त्वाची असून, तिला सुपरफूड (Superfood) मानले जाते. Worlds Worst Dishes)
यादीत ‘हे’ पदार्थ देखील समाविष्ट
“टेस्टअटलास”च्या या यादीत मिस्सी रोटीबरोबरच जेली ईल्स (Jellied Eels), फ्रॉग आय सॅलड (Frog Eye Salad) अशा विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील मिस्सी रोटीचा समावेश झाल्याने सोशल मीडियावर लोकांनी “टेस्टअटलास”च्या या यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी, “प्रत्येकाची चव वेगवेगळी असते, पण मिस्सी रोटीसारख्या चविष्ट आणि पौष्टिक पदार्थाचा या यादीत समावेश करणे अयोग्य आहे,” असे म्हटले आहे, तर काहींनी या यादीला “पक्षपाती” (Biased) म्हटले आहे. Worlds Worst Dishes)
“टेस्टअटलास”वर टीका
“टेस्टअटलास” ही यादी कशाच्या आधारावर तयार करते आणि या यादीत मिस्सी रोटीचा समावेश कोणत्या निकषांवर (Criteria) करण्यात आला, याबाबत “टेस्टअटलास”वर टीका (Criticized) होत आहे.
Title : Missi Roti included in TasteAtlas list of Worlds Worst Dishes in the world
महत्वाच्या बातम्या-
टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर!
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर गुन्हेगाराने केलं असं काही की…, तपासात गुंता वाढला
बीडमध्ये चाललंय काय?, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ‘या’ घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे






