आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत!

On: April 14, 2024 12:10 PM
MI vs CSK Team Prediction
---Advertisement---

MI vs CSK Team Prediction l आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येथे होणार आहे. आयपीएलमधील मुंबई आणि चेन्नई यांच्यातील आतापर्यंतचे बहुतांश सामने रोमांचक झाले आहेत, त्यामुळे चाहते मोठ्या आतुरतेने या सामन्याची वाट पाहत आहेत.

मुंबई विरुद्ध चेन्नई हेड टू हेड :

यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठीअत्यंत खराब झाली आहे, यावेळी त्यांना पहिल्या 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु त्यानंतर त्यांनी सलग 2 सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जने पहिले 2 सामने जिंकले होते परंतु पुढील 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर शेवटच्या सामन्यात CSK ने या हंगामात तिसरा विजय मिळवला आहे.

एकूण खेळलेले सामने : 38
मुंबई इंडियन्सने जिंकलेले सामने : 21
चेन्नई सुपर किंग्जने जिंकलेले सामने : 17
अनिर्णयीत सामने : 0

MI vs CSK Team Prediction l दोन्ही संघाचे संभाव्य शिलेदार :

चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य संघ : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (C), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ: इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (C), टिळक वर्मा, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी,

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हे संघ कधी भिडणार?

रविवारी 14 एप्रिल 2024 हा सामना रंगणार आहे.

MI vs CSK सामना किती वाजता सुरू होईल?

मुंबई विरुद्ध चेन्नई थेट सामना 14 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होईल.

News Title – MI vs CSK Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपचं मोठं आश्वासन! आता घरोघरी मिळणार ही सुविधा

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now