सर्वसामान्यांसाठी खूशखबर! मुंबईत म्हाडाची ४,००० घरांसाठी लॉटरी; अर्जाची मुदत आणि सोडत कधी?

On: September 4, 2026 1:53 PM
MHADA Lottery
---Advertisement---

MHADA Lottery | मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाकडून मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीमध्ये तब्बल 3 ते 4 हजार घरांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. मार्च 2027 पर्यंत ही लॉटरी काढण्याची तयारी असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर (Milind Borikar) यांनी दिली आहे.

मार्चपर्यंत हजारो घरांची सोडत :

मिलिंद बोरीकर यांनी म्हाडाच्या (MHADA) आगामी लॉटरीबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्यात मुंबई मंडळाने सुमारे अडीच हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. या सोडतीसाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 75 हजार अर्ज प्राप्त झाले होते. यावरून म्हाडाच्या घरांना सर्वसामान्यांकडून असलेली मोठी मागणी स्पष्ट होते.

नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन म्हाडाकडून पुढील घरांच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात येत आहे. बोरीकर यांनी सांगितले की, मार्च 2027 पर्यंत मुंबईमध्ये जवळपास 3 हजार ते 4 हजार घरांसाठी नवीन लॉटरी काढण्याचे उद्दिष्ट आहे. या सोडतीत समाविष्ट करण्यात येणारी घरे पुढील एक ते दीड वर्षांच्या कालावधीत नागरिकांना उपलब्ध करून देता येतील, अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे मुंबईत परवडणाऱ्या घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते.

MHADA Lottery | MMRमध्ये 2030 पर्यंत 8 लाख घरांचे नियोजन :

मुंबई महानगर प्रदेशाबाबतही म्हाडाने मोठे उद्दिष्ट निश्चित केले आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार राज्य सरकारने MMR क्षेत्राला ‘ग्रोथ हब’ म्हणून घोषित केले आहे. या भागामध्ये पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत तब्बल 30 लाख घरे उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्याच व्यापक नियोजनाचा भाग म्हणून म्हाडाकडूनही मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत, म्हणजे 2030 पर्यंत, MMRमध्ये सुमारे 8 लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यासाठी परिसरनिहाय नियोजन केले जात असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या 50 वर्षांपासून म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून काम केले आहे. बोरीकर यांच्या माहितीनुसार, म्हाडाने आतापर्यंत आपल्या विविध लेआउटमधून सुमारे सव्वा दोन लाख घरे उभारली आहेत.

News title : MHADA Mumbai Lottery 2027

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now