“लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, चारित्र्याबद्दल बोलूच नको”

On: October 12, 2023 7:17 PM
---Advertisement---

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर बोचरी टीका केली. आता यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे. अनेकांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आता राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

राज्याच्या मोठ्ठ्या ताई सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच, असं चित्र वाघ यांनी म्हटलं होतं. याला मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते, ती गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला बोललं की तिला महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर तिचं तोंड उघडलं, भाषा ऐकली की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तिची भाषा माहिती आहे. तिची भाषा ही महिला आणि बाईपणाला शोभणारी आहे का, हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते, असं म्हणत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना सुनावलं आहे.

भाजपच्या इतर महिला नेत्या आहेत. उमाताई खापरेंसारख्या महिलांबद्दल आदर आहे कारण त्या पातळी सोडून टीका करत नाहीत, त्या सुसंकृत आहेत. पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिला सुसंकृतपणाचा अर्थ कळत नाही, म्हणून तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं, असंही शेख म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now