संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती!

On: January 21, 2025 3:13 PM
Santosh Deshmukh Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder l मस्साजोग (Massajog) येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना एकत्र दर्शविणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहे, ज्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे.

हे सीसीटीव्ही फुटेज २९ नोव्हेंबर २०२४ चे असल्याचे सांगितले जात आहे. याच दिवशी आरोपींनी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे (Aavada Power Company) खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. त्यामुळे हे फुटेज या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा तपशील :

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, वाल्मिक कराड (Walmik Karad), विष्णू चाटे (Vishnu Chate), सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि इतर आरोपी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एकत्र असल्याचे दिसत आहेत. हे फुटेज विष्णू चाटे याच्या केज (Kej) शहरातील कार्यालयातील आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपींनी एकत्र बसून चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून “वाल्मिक अण्णा बोलणार आहेत” असे सांगितले. त्यानंतर त्याच फोनवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलीस एफआयआरमध्ये (FIR) देखील तसाच उल्लेख आहे.

खंडणी आणि हत्येचा संबंध :

केज तालुक्यातील मस्साजोग गावात आवादा कंपनीचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यातील ५० लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचा दावा भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता.

उर्वरित रकमेची मागणी करण्यासाठी वाल्मिक कराडची टोळी गेली असता, तेथे सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या वादात संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. आपल्या खंडणीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खंडणी आणि खून ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित असल्याने या दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी (CID) आणि एसआयटी (SIT) मार्फत केला जात आहे. वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

News Title : Massajog Murder Case Update

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now