“मला राज ठाकरेंना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे”

On: October 22, 2023 4:38 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Marathi Actress Tejaswini Pandit) कायम तिच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मिडीयावरुन फोटो शेअर करत असते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने टोल नाक्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरत आहे.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसादिवशी तेजस्विनीने त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने राज ठाकरे यांचं भरभरुन कौतुक केलं होतं. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर तिला चांगलंच ट्रोल केलं गेलं. त्याच ट्विटविषयीचं (Tweet) स्पष्टीकरण नुकतंच तिने एका मुलाखतीमधून दिलं आहे.

तेजस्विनी म्हणाली, की “आजही हे ठामपणे सांगेन. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे त्यांचं नाही. कारण कुठल्याही मराठी माणसाला कधीही कुठल्याही बाबतीत कुठलीही समस्या आली, तर पहिलं नाव आणि पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तो म्हणजे शिवतीर्थाचा, जो राज साहेबांचा आहे.”

एखाद्या नेत्याविषयी इतका विश्वास का वाटतो? कारण तो माणूस सातत्याने मराठी माणसासाठी काम करतोय. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करतोय. मी त्या माणसासाठी ट्वीट केलं किंवा मी त्यांच्या बाजूने उभी राहिले किंवा मला जे योग्य वाटलं त्याच्या बाजूने उभी राहिले, याचा मला खूप अभिमान आहे. मला याच्यात अजिबात काही गैर वाटतं नाही. मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे, असं तेजस्विनी म्हणालीये.

काही दिवसांपूर्वी टोल नाक्याबाबत तेजस्विनीने आपल्या आधिकृत X अकाउंटवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (DCM Devendra Fadnavis) फडणवीस यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. त्यानंतर तिच्या X वर असलेल्या अकाउंटचं ब्लू टिक हटवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now