मराठा समाज आक्रमक; आणखी एका बड्या नेत्याची गाडी फोडली

On: October 27, 2023 7:56 PM
---Advertisement---

नांदेड | आरक्षणासाठी मराठा (Maratha resrvration) समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांन गावात पाय ठेऊ देणार नसल्याची भूमिका अनेक मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची मोठी गळचेपी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. नांदेडचे भाजप खासदार प्रताप चिखलीकर (Pratap chikhlikar) यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

गुरवारी रात्री प्रताप चिखलीकर जिल्हा परीषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. प्रताप चिखलीकर गावात आले आसल्याचं समजताच, संतप्त मराठा आंदोलक आक्रमक झाले.

आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना आडवलं. यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झाले होते. संतप्त झालेल्या आंदोलकांनी प्रताप चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या. आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसताच, प्रताप चिखलीकर यांनी गावातून काढता पाय केला.

मनोज जरांगे पाटील ( Manoj jarange patil ) दुसऱ्यांदा उपोषणासाठी बसले आहेत. राज्यभरातून त्यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरु आहेत. राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश नाकरला आहे. गुरुवारी सकाळीच अंबुलगा गावात माराठा आंदोलकांनी एकमताने गावात राजकीय नेत्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव केला. अशातच प्रताप चिखलीकर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह गावात आले. त्यावेळी तरुण मराठा आंदोलकांनी त्यांना आडवलं. मोठ्याने घोषणा देत गावातून मागे पाठवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now