Maratha Reservation Update | मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर!

On: November 28, 2023 12:55 PM
Manoj Jarange
---Advertisement---

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यभर दौरा करणार असल्याचं म्हटलं आहे. जरांगेंनी सरकारला (Government) 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. अशात मराठा आरक्षणाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

News Title – maratha reservation update big news about maratha reservation

आरक्षणाबाबात मोठी माहिती समोर

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण (Hunger Strike) केलं. जरांगेंनी आरक्षण मिळावं यासाठी 35 उपोषण केली. त्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळींनी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. सरकारला थोडावेळ द्या, अशी विनंती केली. त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं.

मात्र, माध्यमांच्या माहितीनूसर दिल्ली (Delhi) येथे हालचालींना वेग आलाय. संभाजीराजे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे (SambhajiRaje) केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.

दहा दिवसांआधी संभाजीरीजेंनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. आता ते केंद्रीय मागासवर्ग (Central Backward Classes) आयोगाची भेट घेणार आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संभाजी महाराज यांच्या भेटी मागचं कारण काय?

मराठा समाजाला न्याय (Justice) मिळावा. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळावं, यासाठी संभाजीराजे ही भेट घेणार असल्याचं संभाजीराजे म्हणालेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी संभाजीराजे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.

आज ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांच्यासोबत भेट होणार आहे. या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत.

अशातच राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं जात आहे. कायदेशीर रित्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात संभाजीराजे यांची महत्वाची भूमिका आहे.

थोडक्यात बातम्या-

रिकाम्यापोटी तूप खातात या अभिनेत्री, फायदे ऐकाल तर तुम्हीही सुरु कराल!

Rinku Singh Team India | भारताचा बडा धमाका; रिंकू सिंग घेतोय धोनीची ‘ही’ जागा

Dry Lips Home Remedy | आता हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ, फक्त वापरा हे सोपे उपाय!

Samsung Galaxy | 50MP Camera, 5000mAh बॅटरी, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, या फोनची बाजारात क्रेझ

Hasin Jahan च्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री; स्वतः दिली कबुली

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now