मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

On: March 18, 2024 7:16 PM
Maratha Protest
---Advertisement---

Maratha Protest | राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, मागील 2 महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी राज्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी जालना जिल्ह्यात काही राजकीय नेत्यांच्या घरावर जाळपोळ करण्यात आला होता. दरम्यान यावेळी आक्रमक झालेल्या मराठा समाजावर सरकारने गुन्हे दाखल केले होेते. मात्र, आता हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज (18 मार्च) दुपारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी मराठा आंदोलकांवर (Maratha Protest) दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं म्हटलं आहे. बोलत असताना शिंदे म्हणाले की, “मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणी नुसार मागे घेण्यात येत आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता रोकोवरुन गुन्हे दाखल झाले आहेत.

गंभीर गुन्हे दाखल होतील-

सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे. त्यामुळे त्याची छाननी सुरु आहेत, ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्यांचं वर्गीकरण केलं जाईल. जे गंभीर गुन्हे आहेत, ज्यात जीवितहानी, वित्तहानी आहे, (Maratha Protest) मालमत्तेचं नुकसान झालं आहे, त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसवून सकारात्मक मार्ग काढणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे-

पुढे बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत होते. दरम्यान, जरांगेंच्या मागणीप्रमाणे आम्ही मराठा समाजाला विषेश अधिवेशन घेऊन, 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे. आता पोलीस भरती सुरु आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा होईल.

News Title : Maratha protest cm eknath shinde discuss

महत्त्वाच्या बातम्या-

“मर्दा सारखं… ”, भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘अशा’ व्यक्तींमध्ये कधीच जीव अडकवू नका, नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

मोठी बातमी! इम्तियाज जलील यांना ‘एमएआयएम’कडून उमेदवारी जाहीर

“अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या…”; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now