मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!

On: October 31, 2023 10:56 AM
---Advertisement---

बीड | बीडमध्ये सुरु असलेल्या जाळपोळीवरुन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आंदोलकांना इशारा दिला. जाळपोळीची घटना घडल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. तसेच सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा जरांगेंना संशय आहे. 

मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर जमावाने बीड बस स्थानकातील एक ही एसटी फोडायची शिल्लक ठेवली नाही.

सोमवारी जमावाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बस स्टॅन्डमध्ये आला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. या सर्व एसटी जमावाने फोडल्या.

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now