जरांगेंच्या भगव्या वादळाचा मार्ग ठरला! मुंबईत कसं धडकणार? वाचा संपूर्ण ‘प्लॅन’

On: August 23, 2025 5:46 PM
Maratha Reservation
---Advertisement---

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील मराठा समाजाच्या हजारो बांधवांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चासह धडकणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळातच मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू असणार असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.

मनोज जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते 29 ऑगस्ट रोजी रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील. त्यांच्या या प्रवासात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं चित्र आहे.

जरांगे पाटलांचा मुंबईकडचा नेमका मार्ग :

27 ऑगस्ट : अंतरवाली सराटी → शहागड फाटा → साष्ट पिंपळगाव → आपेगाव → पैठण कमान → घोटण → शेवगाव → मिरी नाका → पांढरी पुल → अहिल्यानगर बायपास → नेप्ती चौक → आळाफाटा → शिवनेरी किल्ला (येथे मुक्काम)

28 ऑगस्ट : शिवनेरी किल्ल्यावर दर्शन → राजगुरुनगर → खेड → चाकण → तळेगाव → लोणावळा → पनवेल → वाशी → चेंबूर → मुंबई आझाद मैदान

या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation | राज्यभरात जोरदार तयारी :

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात ‘चलो मुंबई’ अशी हाक दिली जात आहे. गावोगावी चावडी बैठका घेऊन समाजबांधवांना मुंबईला हजेरी लावण्याचे आवाहन केले जात आहे. धाराशिव, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव मुंबई गाठणार आहेत.

मुंबईतील आझाद मैदानावर या मोर्चाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे.

जरांगे यांचा सरकारला इशारा :

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. सरकारने 26 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही, तर 27 ऑगस्टला आम्ही मुंबईकडे रवाना होऊ. 29 ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांसह आझाद मैदानात धडकू.” (Maratha Reservation)

त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची तयारी असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मोर्चा यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेवर ताण येणार आहे.

News Title : “Manoj Jarange’s Maratha Quota Protest to Reach Mumbai on 29 August: Full Route & Timeline”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now