“भुजबळांना समज द्या… माझ्या नादी लागले तर काही खरं नाही”

On: October 14, 2023 12:34 PM
---Advertisement---

जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवली सराटी गावात सभा होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आवाहन केलं आहे. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार तुमच्या पक्षातील नेत्याला सांभाळा. नाहीतर मी असा मागे लागेल की सोडणार नाही. माझ्या नादाला लागल्यावर मी अजिबात सोडत नाही. उपमुख्यमंत्र्यांनी असले येडपट पाळलेतच कसे, असं जरांगे पाटील म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मराठ्यांना उचकवायला सांगितलं आहे. त्यासाठीच छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे बोलत आहेत. पण आम्ही मराठे शांततेच्या मार्गानेच लढू. उद्रेक जाळपोळ होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटणार नाही. छगन भुजबळ यांनी आता घरात बसावं, असं जरांगे पाटील म्हणालेत.

माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं. पण फेसबुक अकाऊंट काय आहे? लोक एवढे जमलेत. त्या पुढं फेसबुक अन् इंटरनेट काय आहे? आता आम्हा मराठ्यांना रोखू शकत नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now