जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

On: January 28, 2024 3:24 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यापासून मराठा बांधवाना हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत होते. त्यानंतर जरांगे पाटलांनी जालना येथे अंतरवाली सराटी या गावात त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. जरांगे मागचा पुढचा विचार न करता मराठा आरक्षणासाठी लाढत राहीले आणि अखेर सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आपल्या समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी सभा घेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठा आरक्षणासाठी जिवाचं रान करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. दरम्यान सरकारने त्यांच्या मागण्याला मान्यता देत जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालं आहे. मात्र जरांगेंनी आज अंतरवालीमध्ये आज सभा घेतली होती. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सभेत बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, “आपल्या बाजूने कायदा झाला असला तरी आपल्याला हे आंदोलन सुरूच ठेवायचं आहे, असं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) यावेळी जाहीर केलं आहे”. हे आंदोलन सुरू ठेवण्याबाबत त्यांनी समाजाचीही संमती घेतली आहे. तसेच आंदोलन सुरू ठेवण्यामागची कारणं सांगितली आहेत.

Manoj Jarange | अंतरवालीमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत

जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आमरण उपोषण केले. अखेर जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं. त्यामुळे जरांगेंच्या अतंरवालीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील काल मध्यरात्री अंतरवली सराटीत आले होते. यावेळी त्यांचं ढोलताशे वाजवून स्वागत करण्यात आलं होतं.

आंदोलन सुरु राहणार?

जरांगे पाटील यांनी अंतरवालीमध्ये सभा घेतली त्यावेळेस त्यांनी एक सभा बोलावली. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. तसेच नव्या अध्यादेशाचं महत्त्वं सांगतानाच आंदोलन सुरू ठेवायचं की नाही याबाबतची चर्चाही केली. यावेळी त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्यामागची त्यांची भूमिका मांडली. त्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

News Title | manoj jarange to continue Maratha reservation protest

महत्त्वाच्या बातम्या-

Bihar Politics | ‘…म्हणून मी राजीनामा दिला’; नितीश कुमारांनी सांगितलं खरं कारण

LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना

Nitish Kumar | बिहारमधील राजकीय नाट्याच्या शेवट, अखेर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय

गायक Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण, व्हिडीओ तूफान व्हायरल

लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now