विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!

On: February 20, 2024 10:22 AM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आज (20 फेब्रुवारी) मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र, त्यापुर्वीच जरांगे पाटील यांनी मोठी मागणी करत गंभीर इशारा दिला आहे.

आज होणाऱ्या विशेष अधिवेशनापुर्वी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. तसेच सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा,असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आजच्या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

कोण काय बोलतं याकडे समाजाचं लक्ष आहे. आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे. डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी आहे. आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या. या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या. असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

आज सरकारच्या भूमिकेकडं सर्व मराठ्यांचं लक्ष असणार आहे. या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या, तुम्ही मराठा विरोधी आहे काय, हे सुध्दा आज दिसून येईल. असे जरांगे म्हणाले आहेत.

जरांगे  पाटील यांनी काय मागणी केली?

कोणाच्या केसेस मागे गेल्या, याला फोडून पक्षात आणणं, कोणाला फोडणं याला काय मागण्या म्हणत नाही. आम्ही करत असलेलं आंदोलन किती महत्वाचं आहे, हे सरकारलाही ठाऊक आहे. त्यामुळे आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या,अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

आजच्या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अहवाल सरकारला नुकताच सादर केला आहे. यापूर्वी दोन वेळा केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकला नव्हता. या पार्श्वभूमीवर आता होणारा कायदा टिकविण्याचे आव्हान महायुती सरकारसमोर असणार आहे.

तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच नव्हे, तर इतर कोणत्याच समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, कुणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.त्यामुळे आजच्या अधिवेशनात काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आजच्या अधिवेशनात काय होईल, यावरून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुढची भूमिका ठरवतील.

News Title-  Manoj Jarange Patil serious warning to the government before the special session

महत्त्वाच्या बातम्या –

एकटे टाटा सगळ्या पाकिस्तानवर ‘भारी’, शेजाऱ्यांच्या GDP ला टाकलं मागं

बाप तसा बेटा! ‘गड आला, पण सिंह गेला’, अर्जुन तेंडुलकरची ‘सर्वोत्तम’ कामगिरी!

परीक्षेत चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड; तपासात झाला धक्कादायक खुलासा

शेतकरी आंदोलन! सात जिल्ह्यांमध्ये ‘या’ गोष्टीवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय

“अजित पवारांच्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली”

Join WhatsApp Group

Join Now