मनोज जरांगे पाटलांचा थेट पंकजा मुंडेंना इशारा, म्हणाले…

On: April 20, 2024 5:23 PM
Manoj jarange Patil on Pankaja Munde
---Advertisement---

Manoj jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील सततच्या टीकेमुळे चर्चेत होते. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून जरांगे यांनी तूर्तास तरी आपलं आंदोलन थांबवल्याचं दिसतंय. त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधील एका सभेत प्रथमच जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना दिसून आल्या.

यावरच आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट पंकजा मुंडे यांना इशारा दिला आहे. उपोषण करुन आरक्षण मिळत नसतं, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यावरच आज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले जरांगे पाटील?

‘पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलं नाही. मी त्यांना विरोधक मानलेलं नाही. मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका.’, असा दमच जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे चर्चेत आले आहेत.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. उपोषण काळात पंकजा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. अशात एका सभेत त्या टीका करताना दिसून आल्या.

‘सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही’, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यांनी यात जरांगे यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा निशाणा जरांगे पाटील यांच्यावरच असल्याचं म्हटलं गेलं. त्या (Pankaja Munde) जाटनांदूर येथे जाहीर सभेत बोलत होत्या.

या सभेत पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. मला दिल्लीत जाण्याची हौस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही माझी मागणी होती. पण कोअर कमिटीने माझं नाव घेतलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

News Title : Manoj jarange Patil on Pankaja Munde

महत्त्वाच्या बातम्या-

माढ्याचा तिढा सुटल्यानंतर ‘या’ नेत्याला शरद पवारांचं मोठं गिफ्ट, केली मोठी घोषणा

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पीत असाल तर सावधान, तज्ज्ञांचा मोठा इशारा

भाजपकडून भीती दाखवली जातेय!, अजित पवार गटाच्या नेत्याचे धक्कादायक आरोप

जुन्या जखमा अजून भरलेल्या नाहीत!, पाटलांच्या पोरीच्या वक्तव्याने अजित पवारांच्या पोटात गोळा

बारामतीसाठी अजित पवारांचं सपशेल लोटांगण, फडणवीस सांगतील ती पूर्व दिशा!

Join WhatsApp Group

Join Now