Manoj jarange Patil: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय

On: January 25, 2024 2:48 PM
manoj jarange patil
---Advertisement---

Manoj jarange Patil | आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय?-

माझा समाज आरक्षणासाठी मुंबईला चालला आहे. तोडगा निघावा म्हणून आम्ही इथं लोणावळ्यात थांबलो होतो. तोडगा निघावा ही आमची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil ) यांनी लोणावळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने निघणार-

लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं आणखी मोठं शिष्टमंडळ येणार आहे ते आलं की रस्त्यात त्यांच्यासोबत चर्चा करु आणि काय ते ठरवू, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली त्यावर काय?-

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil ) यांनी नाकारलं आहे. ते म्हणाले आम्हाला परवानगी भेटलेली आहे, आमच्या लोकांनी आझाद मैदानावर तयारी देखील सुरु केली आहे. तिथं स्टेज उभं केलं जातंय त्यामुळे परवानगी वगैरे नाकारली हे काही खरं नाही.

Manoj Jarange Patil यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना आवाहन-

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शिष्टमंडळ पाठवू नका, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, मी आझाद मैदानावरच आंदोलन करणार, असं म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil ) यांनी पत्रकार परिषद संपवली.

News Title: Manoj jarange Patil on mumbai police Notice

महत्त्वाच्या बातम्या-

Preity Zinta | बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ पाच वर्षांनी करणार कमबॅक?; ‘या’ अभिनेत्यासोबत दिसणार मोठ्या पडद्यावर

Sania Mirza: “मला माहीत नाही मी तिच्यामध्ये…”; सानियासोबतच्या लग्नाबद्दल Shoaib Malikचा धक्कादायक खुलासा

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now