“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

On: March 11, 2024 3:27 PM
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

काल (10 मार्च) परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली. परभणीमधील मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याच सभेमध्ये जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले. “फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपाडा साफ होईल”, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

आमच्या आंतरवाली येथील माता माऊलींच्या डोक्यात गोळ्या घातल्या तेव्हा तुम्हाला आई बहीण कळलं नाही का?, एका नऊ वर्षाच्या  मुलीच्या पायात गोळ्या घातल्या. तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला. आता तुमची गाठ आमच्याशी आहे. मी माझ्या समाजाला दैवत मानलं. माझं कुटुंबं मी बाजूला सारून मी समाजासाठी काम करतोय, असं यावेळी जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं.

फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या, पण तसे होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे.

छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा

आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, यासाठी आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असा इशाराच यावेळी जरांगे यांनी दिला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. छगन भुजबळ आठ दिवसापासून गार पडले आहेत. हिमालयात जाऊन बसले आहेत का?, असा टोला जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी लगावला.

जरांगे यांनी मागेही फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांना मला मारायचे आहे, त्यांचा सलाईन मधून मला विष देण्याचा प्लॅन असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. यामुळे भाजपकडून बरीच टीका झाली. तर, अधिवेशनामध्ये जरांगे यांच्या पाठीमागे नेमकं कोण, त्यांची भाषा नेमकी कुणाची?, असा सवाल केला गेला. इतकंच नाहीतर जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

News Title : Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

Join WhatsApp Group

Join Now