“मी मुंडक्यावर बसून आरक्षण घेत असतो”; मनोज जरांगे कडाडले

On: March 11, 2024 8:32 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण करताना दिसत आहेत. त्यांनी सरकारकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावं अशी मागणी केली. त्यानंतर सगेसोयरे प्रकरणी अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागणी केली. ते आज परभणीमध्ये असून उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत.

नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर हल्ला

परभणीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमरावतीत आले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संभाजीनगरमध्ये आले. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर फुलांची उधळण केली नाही म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी मोदी-शहांवर हल्ला केला.

परभणीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची सभा आहे. ते आता उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आपली जात खूप दिवसानंतर एकत्र आली आहे. फूट पडू देऊ नका…सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण हे आपल्याला नकोय. भरतीमध्ये आपल्याला या आरक्षणाचा कसलाही फायदा नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“सरकार मराठा समाज संपवत आहे”

सरकार डाव टाकत मराठा समाज संपवत आहे. तुला नेत्यांनी मोठं नाही केलं, या मराठ्यांनी मोठं केलं आहे. जातीकडून बोलायचे सोडून नेत्यांकडून बोलत आहात. तुला तुझा नेता मोठा करणार का? ज्या जातीने मोठं केलं त्याचे उपकार फेडायला पाहिजे. ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“मी मुंडक्यावर बसून आरक्षण घेत असतो”

मी मुंडक्यावर बसून आरक्षण घेत असतो. सहा महिने मी फडणवीस यांच्याबद्दल बोललो नाही. पण मराठा आरक्षणावर बोलणाऱ्याला आम्ही सोडत नाही, असं ते म्हणालेत.

सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाली तरीही हे काम टिकवणं सरकारच्या हातात आहे. 10 टक्के आरक्षण देऊनही मराठा समाज खूश नाही, असं मनोज पाटील म्हणाले आहेत.

News Title- Manoj Jarange Patil News Update Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल झटपट श्रीमंत!

“ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर..”, विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा

पती विकी जैनला घटस्फोट देण्याबद्दल अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

डबल महाराष्ट्र केसरी करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश?

Join WhatsApp Group

Join Now