मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती चिंताजनक; महिलांचा आक्रोश सुरू

On: February 15, 2024 3:27 PM
Manoj Jarange patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी केली. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी कोट्यवधी मराठा बांधव सोबत घेत मुंबईकडे कूच केली होती. त्यावेळी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे अडवून मराठा समाजाच्या मागणीचा अध्यादेश दिला. मात्र त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं आहे. यामुळे आता त्याच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून गेली सहा दिवस झाले त्यांनी अन्न त्याग, पाणी आणि औषधोपचाराचा त्याग केला आहे. यामुळे आता त्यांची प्रकृती बिघाडली आहे. यामुळे आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांना जालना जिल्हा रूग्णालयाच्या काही डॉक्टरांनी सलाईन लावण्यासाठी विनंती केली होती, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यासाठी नकार दिला होता. अंतरवाली सराटीतील नागरिकांनी मनोज जरांगे यांना पाणी घेण्याबाबत औषधोपचार घेण्यासाठी विनंती केली होती मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं म्हणून मराठा बांधव त्यांनी हात जोडून विनंती करत आहेत. मात्र आता त्यांना पाणी देखील घोटवत नसल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाणी घोटवेना

मनोज जरांगे पाटील यांना पाणी घोटवत नसल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नारायण गडाचे महंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी विनंती करत होते. मात्र मनोज जरांगे शांततेच्या अवस्थेत पडले होते. यावेळी त्यांना पाणी पाजत असताना मनोज जरांगे यांना पाण्याचा घोट देखील घेता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांची रडारड सुरू

मनोज जरांगे पाटील यांना पाणी देखील घोटवत नाही. यामुळे आता त्यांची प्रकृती गंभीर होताना दिसत आहे. त्यांना ग्लानी आली आहे. त्यांच्या पोटातही दुखत आहे. आजूबाजूला महिला रडत आहेत. यावेळी ‘पाणी घ्या’, अशी उपस्थितांनी घोषणा केली आहे.

अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं आणि लवकरात लवकर या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी व्हावी ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीला उपोषणास सुरूवात केली आहे.

News Title – Manoj jarange Patil health update

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग खान’ च्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

शेतकरी आंदोलन चिघळलं, 40 आंदोलक जखमी

मोठी बातमी! गणपत गायकवाड प्रकरणी महत्त्वाची बातमी

“ज्याने तुमच्यासोबत…”, घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची भावूक पोस्ट

शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

Join WhatsApp Group

Join Now